क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांची बेळगावला धावती भेट; नवोदितांना मोलाचे मार्गदर्शन

क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांची बेळगावला धावती भेट; नवोदितांना मोलाचे मार्गदर्शन

बेळगाव : मुंबईचे नामवंत क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांनी बेळगाव शिक्षण सोसायटीच्या आवारातील बेळगाव स्पोर्ट्स क्लबच्या प्रशिक्षण केंद्राला धावती भेट देत नवोदित खेळाडूंना मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांच्या भेटीमुळे युवा क्रिकेटपटूंमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

सोसायटीचे चेअरमन आणि बेळगाव स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष अविनाश पोतदार तसेच कार्यकारी अध्यक्ष दीपक पवार यांच्या हस्ते दिनेश लाड यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अविनाश पोतदार यांनी बेळगाव क्रिकेटच्या गौरवशाली इतिहासाची माहिती देत जुन्या खेळाडूंच्या योगदानाचा गौरव केला. तसेच दिनेश लाड यांनी रोहित शर्मा ,शार्दुल ठाकूर आणि सिद्धेश लाड यांसारखे दर्जेदार खेळाडू घडविल्याचा उल्लेख केला.

त्यांच्या कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने त्यांना छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार तर भारत सरकारने प्रतिष्ठेचा द्रोणाचार्य पुरस्कार देऊन गौरविल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

सत्काराला उत्तर देताना दिनेश लाड यांनी यशस्वी होण्यासाठी सातत्यपूर्ण परिश्रम, शिस्त आणि जिद्द किती महत्त्वाची आहे हे पटवून दिले. खेळाडूंच्या जडणघडणीत पालक आणि प्रशिक्षक यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगत त्यांनी सर्वांगीण विकासावर भर देण्याचे आवाहन केले. बेळगाव स्पोर्ट्स क्लबच्या कार्याचे कौतुक करत भविष्यात या क्लबची वाटचाल अधिक गौरवशाली होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी दिनेश लाड यांच्या हस्ते जुने खेळाडू श्री ज्ञानेश्वर श्रेयकर यांचा बॅट देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास बी. के. मॉडेल शाळेचे मुख्याध्यापक एस. एम. जोशी, रवी घाटगे, बाळकृष्ण पाटील, विजयकुमार पाटील, विठ्ठल भट्ट, आनंद करडी यांच्यासह मोठ्या संख्येने युवा खेळाडू व पालक उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

thirteen + one =

error: Content is protected !!