संगोळी रायण्णा पुतळ्यावर आढळलेला चिकट पदार्थ झाडाच्या राळेचा; RFSL अहवालातून स्पष्ट.

संगोळी रायण्णा पुतळ्यावर आढळलेला चिकट पदार्थ झाडाच्या राळेचा; RFSL अहवालातून स्पष्ट.

बेळगाव, दि. २१ (प्रतिनिधी) : शहरातील एका पुतळ्यावर आढळलेल्या चिकट पदार्थाबाबत सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळाला असून, प्रादेशिक न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेच्या (RFSL) अहवालात संबंधित नमुन्यांमध्ये वनस्पतीजन्य राळ (प्लांट रेजिन) असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पुतळा, त्याच्या आसपासचा रस्ता तसेच जवळील झाडांच्या पानांवरून गोळा करण्यात आलेल्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये आढळलेला पदार्थ झाडावरून खाली पडणारी चिकट राळ असल्याचे निष्पन्न झाले आहे.

दरम्यान, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी करण्यात आली असता कोणत्याही व्यक्तीने पुतळ्यावर काही फेकल्याचे आढळून आले नाही. त्यामुळे ही घटना कोणत्याही समाजविघातक कृत्याशी संबंधित नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

या अहवालानंतर पुतळ्यावर जाणूनबुजून काही पदार्थ फेकण्यात आल्याच्या अफवांना पूर्णविराम मिळाला असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

#Belgav #BedhadakBelgav

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

one × two =

error: Content is protected !!