बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे १ मार्चला मराठी भाषा गौरव दिन सोहळा; अभिनेते हेमंत ढोमे यांची प्रमुख उपस्थिती

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे १ मार्चला मराठी भाषा गौरव दिन सोहळा; अभिनेते हेमंत ढोमे यांची प्रमुख उपस्थिती

बेळगाव : मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, बेळगाव यांच्या वतीने दिमाखदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा रविवार, दिनांक १ मार्च २०२६ रोजी दुपारी ३.०० वाजता मराठा मंदिर, बेळगाव येथे संपन्न होणार आहे.

जानेवारी महिन्यात आयोजित सामान्यज्ञान स्पर्धेत बेळगाव व सीमाभागातील सुमारे ३,००० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे बक्षीस वितरण, आदर्श शाळा पुरस्कार प्रदान तसेच २०२५ मध्ये दहावी परीक्षेत अव्वल आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार या कार्यक्रमात करण्यात येणार आहे.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते, लेखक व दिग्दर्शक हेमंत ढोमे उपस्थित राहणार आहेत. त्यांनी क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम या गाजत असलेल्या चित्रपटासह , फस्टक्लास दाभाडे, झिम्मा, सनी आणि बघतोस काय मुजरा कर आदी चित्रपटांचे लेखन व दिग्दर्शन केले आहे. ‘क्षणभर विश्रांती’ (२०१०) या चित्रपटातून त्यांनी अभिनय व लेखन प्रवासाची सुरुवात केली. सामाजिक व राजकीय विषयांवर ते समाजमाध्यमांतून परखड मते मांडत असतात आणि विशेषतः मराठी शाळा व भाषेच्या संवर्धनासाठी ते सक्रिय आहेत.

या कार्यक्रमात ते “अस्तित्व मराठी शाळेचे, संवर्धन मराठी भाषेचे” या विषयावर मार्गदर्शन करणार असून विद्यार्थी व पालकांशी संवाद साधणार आहेत.

मराठी भाषेचा अभिमान जागवण्यासाठी आणि तरुण पिढीला प्रेरणा देण्यासाठी आयोजित या सोहळ्यास बेळगावमधील मराठी प्रेमी, शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

#Belgav #BedhadakBelgav

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

one × four =

error: Content is protected !!