बेळगाव : बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनच्या स्केटर्सनी गोवा येथे आयोजित निमंत्रित स्केटिंग स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली. या स्पर्धेत ४०० हून अधिक अव्वल स्केटिंगपटूंनी सहभाग घेतला होता. गोवा येथे पार पडलेल्या या स्पर्धेत बेळगावचा स्केटर आरशान माडीवाले याने उत्कृष्ट प्रदर्शन करत दोन कांस्यपदके पटकावली.
आरशान हा के. एल. ई. सोसायटी स्केटिंग रिंक, गुड शेफर्ड स्केटिंग रिंक तसेच शिवगंगा स्पोर्ट्स क्लब येथे नियमित सराव करीत आहे. त्याला प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, विठ्ठल गंगणे, योगेश कुलकर्णी, विश्वनाथ येल्लूरकर आणि सोहम हिंडलगेकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
तसेच डॉ. प्रभाकर कोरे, माजी आमदार शाम घाटगे, राज घाटगे, उमेश कलघटगी आणि प्रसाद तेंडुलकर यांचे प्रोत्साहन लाभत असल्यामुळेच ही यशस्वी कामगिरी शक्य झाल्याची भावना व्यक्त होत आहे. आरशानच्या या यशाबद्दल क्रीडा क्षेत्रातून त्याचे अभिनंदन करण्यात येत आहे.
