प्रामाणिकतेचा उत्तम आदर्श; सापडलेले मंगळसूत्र महिलेला सुपूर्द

प्रामाणिकतेचा उत्तम आदर्श; सापडलेले मंगळसूत्र महिलेला सुपूर्द

बेळगाव – ५ फेब्रुवारी २०२६ रोजी शहरातील शनिवार कूट मुख्य रस्त्यावर एक मंगळसूत्र पडलेले आढळून आले. हे लक्षात येताच वैभवनगर येथील रहिवासी तसेच के.एल.ई. कॉलेजचे कर्मचारी श्री नागप्पा शंकरप्पा बेविनमरद आणि ज्योतिनगर येथील ऑटो चालक श्री हनुमंत कळकेश किल्लिकेतर यांनी तत्काळ ते उचलून खडेबाजार पोलिस ठाण्यात जमा केले.

मंगळसूत्राच्या खऱ्या मालकिणीचा शोध घेऊन ते परत द्यावे, अशी विनंती त्यांनी पोलिसांकडे केली. खडेबाजार पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली असता, संबंधित मंगळसूत्र हे बैलहोंगल तालुक्यातील चचडी गावच्या रहिवासी श्रीमती बसव्वा सोमप्पा कुरबर यांचे असल्याचे निष्पन्न झाले. त्या भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात.

पोलिसांनी बसव्वा यांना ठाण्यात बोलावून आवश्यक शहानिशा केली आणि नागप्पा व हनुमंत यांच्या हस्ते मंगळसूत्र त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. मौल्यवान दागिना प्रामाणिकपणे परत केल्याबद्दल दोघांच्या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

या प्रकरणात तत्परतेने कार्य करून संबंधित महिलेचा शोध लावणाऱ्या खडेबाजार पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांचेही पोलिस आयुक्त, बेळगाव शहर तसेच डीसीपी यांनी अभिनंदन केले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

17 + 16 =

error: Content is protected !!