छ.शिवाजी गार्डन येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर; नागरिकांना लाभ घेण्याचे आवाहन

छ.शिवाजी गार्डन येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर; नागरिकांना लाभ घेण्याचे आवाहन

बेळगाव (प्रतिनिधी) : के. एल. ई सेंटेनरी चॅरिटेबल हॉस्पिटल, येळ्ळूर रोड यांच्या वतीने सामान्य नागरिकांच्या आरोग्य हितासाठी शनिवार दिनांक १४ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर येथे पार पडणार आहे.

जीवनशैलीशी संबंधित आजारांचे लवकर निदान व्हावे व नागरिकांमध्ये आरोग्याबाबत जनजागृती निर्माण व्हावी, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. वाढता ताणतणाव, अनियमित आहार आणि बदलती जीवनशैली यामुळे उच्च रक्तदाब, मधुमेह आणि लठ्ठपणा यांसारख्या आजारांचे प्रमाण वाढत असल्याने नियमित तपासणी करणे आवश्यक ठरते.

या शिबिरात रक्तदाब (BP) तपासणी, रक्तातील साखर (Sugar) तपासणी तसेच उंची व वजन मोजून बीएमआय (BMI) तपासणी मोफत करण्यात येणार आहे. तज्ज्ञ वैद्यकीय पथक नागरिकांना प्राथमिक सल्ला व मार्गदर्शन देणार आहे.

शिबिराची वेळ सकाळी ६.०० ते ९.०० अशी असून सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन रुग्णालय प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. वेळेवर तपासणी केल्यास संभाव्य आजारांचे निदान लवकर होऊन पुढील गुंतागुंत टाळता येऊ शकते.

#Belgav #BedhadakBelgav

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

6 − 1 =

error: Content is protected !!