बेळगाव जिल्हा स्केटिंगअसोसिएशन च्या वतीने स्केटिंग स्पर्धा उत्साहात पार

बेळगाव जिल्हा स्केटिंगअसोसिएशन च्या वतीने स्केटिंग स्पर्धा उत्साहात पार

बेळगाव – व यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित खुल्या जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धा मराठा मंडळ, खानापूर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. या स्पर्धेचे उद्घाटन व बक्षीस वितरण समारंभ साई स्पोर्ट्स अकॅडमीचे प्रसाद जाधव व राजलक्ष्मी जाधव यांच्या शुभहस्ते पार पडले.

कार्यक्रमास सुर्यकांत हिंडलगेकर, योगेश कुलकर्णी, ऋषिकेश पसारे तसेच स्केटर्स व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्ह्यातील सुमारे ६० स्केटिंग खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग घेतला. विजेत्या स्पर्धकांना मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

विजेते स्पर्धक पुढीलप्रमाणे:

आशिष अंगडीकर (२ सुवर्ण), सोहम वाघमारे (२ रौप्य), सार्थक मार्दोळकर (२ कांस्य), आरोही काटगाळकर (२ सुवर्ण), सई आनंदाचे (२ सुवर्ण), मायशा जैन (२ रौप्य), नक्ष हिरेमठ (२ सुवर्ण), कार्तिक चौधरी (२ सुवर्ण), विक्रांत चौधरी (२ सुवर्ण), स्वराज पाटील (२ रौप्य), सुजित साळोखे (२ सुवर्ण), शिवांगी मोदगेकर (२ सुवर्ण), श्रेयस बजंत्री (२ सुवर्ण), आदिया सय्यद (२ सुवर्ण), अभिना तहसीलदार (२ सुवर्ण), अल्मास तहसीलदार (२ सुवर्ण), अक्किरांक्ष (२ सुवर्ण).

स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी योगेश कुलकर्णी, ऋषिकेश पसारे व इतर कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. या स्पर्धेमुळे जिल्ह्यातील युवा खेळाडूंना प्रोत्साहन मिळाले असून स्केटिंग क्रीडेला नवे बळ मिळाले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

20 − thirteen =

error: Content is protected !!