ग्रामीणचा राजा पाट पूजन सोहळा जल्लोषात; पाईपलाईन रोड विजयनगर, बेळगाव येथे भक्तिमय वातावरण

ग्रामीणचा राजा पाट पूजन सोहळा जल्लोषात; पाईपलाईन रोड विजयनगर, बेळगाव येथे भक्तिमय वातावरण

विजयनगर पाईपलाईन रोड, बेळगाव येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या श्री विघ्नहर्ता युवक मंडळ तर्फे नावाजलेल्या ग्रामीणचा राजा गणेशोत्सवाच्या पाट पूजन सोहळ्याचे आयोजन मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने करण्यात आले. मंडळाच्या यंदाच्या २३ व्या वर्षानिमित्त आयोजित या सोहळ्याला परिसरात उत्सवाचे आणि भक्तिमय वातावरण लाभले.

आकर्षक विद्युत रोषणाईने संपूर्ण परिसर झगमगून निघाला होता. गजवक्र ढोलताशा पथकाच्या दमदार वादनाने वातावरण भारावून गेले आणि उपस्थित गणेशभक्तांनी जयघोषात सहभाग नोंदविला. मोठ्या संख्येने महिला, युवक, तसेच नागरिकांनी उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवली.

या पाट पूजनाचा विधी शंकर कांबळे आणि डी. बी. पाटील यांच्या हस्ते पार पडला. त्यांच्या हस्ते आरती करण्यात आली आणि सर्वांनी एकमुखाने गणरायाच्या जयघोषात सहभाग घेतला.

मंडळाचे अध्यक्ष राहुल उरणकर आणि उपाध्यक्ष रणजीत पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा सोहळा यशस्वीपणे पार पडला. यावेळी कार्यकर्ते सचिन पावशे, सूरज करडे, पियूष हावळ, बाळकृष्ण दफेदार, सदानंद शिंदे तसेच इतर युवा कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. मंडळाच्या युवा कार्यकर्त्यांच्या मेहनतीतून हा भव्य पाट पूजन सोहळा साकार झाला.

ग्रामीणचा राजा गणेशोत्सवाच्या २३ व्या वर्षात पदार्पण करताना मंडळाने भक्ती, एकता आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला असून आगामी उत्सवासाठीही नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

7 + 8 =

error: Content is protected !!