महाशिवरात्री महोत्सवानिमित्त श्रीक्षेत्र दक्षिणकाशी कपिलेश्वर मंदिरात पूर्वतयारीची पाहणी

महाशिवरात्री महोत्सवानिमित्त श्रीक्षेत्र दक्षिणकाशी कपिलेश्वर मंदिरात पूर्वतयारीची पाहणी

श्रीक्षेत्र दक्षिणकाशी कपिलेश्वर मंदिराच्या वतीने यावर्षीच्या महाशिवरात्री महोत्सवानिमित्त भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी पूर्वतयारीचा पाहणी करण्यात आली. उत्सवादरम्यान येणाऱ्या हजारो शिवभक्तांच्या सोयीसुविधा, सुरक्षा व्यवस्था आणि गर्दी नियंत्रणाच्या दृष्टीने संबंधित विभागांशी समन्वय साधण्यात आला.

या पाहणी दौऱ्यात खडेबाजार पोलीस स्टेशनचे मुख्य अधिकारी महांतेश दामणावर, एक्स्ट्रीम सिक्युरिटीचे रघुनाथ देसाई व त्यांचे सहकारी, महानगरपालिकेचे आनंद पिंपळे तसेच श्री कपिलेश्वर ट्रस्टचे अध्यक्ष राहुल कुरणे, अभिजीत चव्हाण, विवेक पाटील, प्रथमेश कावळे, ज्योतिबा कावळे आणि संतोष देवर उपस्थित होते.

उत्सव काळात भाविकांसाठी सुरळीत दर्शन, वाहतूक व्यवस्था आणि सुरक्षा यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

eight − seven =

error: Content is protected !!