गोकाक येथील संगमनगर परिसरातील सान्वी बसवराज नवी ही हरवलेली चिमुकली बेळगाव येथील सीबीटी बसस्थानकात सुखरूप आढळून आली. माहिती मिळताच फेसबुक फ्रेंड्स सर्कलच्या सदस्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि याबाबत मार्केट पोलीस ठाणे, बेलगाव यांना कळविले. पोलीस पथकाने तातडीने येऊन मुलीला ताब्यात घेत सुरक्षिततेची खात्री केली.
त्यानंतर गोकाकमधील मित्रांच्या मदतीने मुलीचा पत्ता शोधण्यात यश आले. या शोधमोहीमेत संतोष दरेकर, सामाजिक कार्यकर्ते अवधूत तुदेवकर, पद्मप्रसाद हूळी, राजू तक्केकर, मायकेल पिंटो आणि भारतेश लाटूकर यांनी सक्रिय सहभाग घेतला.
सर्वांच्या तात्काळ प्रतिसाद आणि सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. फेसबुक फ्रेंड्स सर्कलने आतापर्यंत हरवलेल्या व्यक्तींच्या ४१ प्रकरणांचा यशस्वी छडा लावला असल्याची माहिती देण्यात आली.
