तिसऱ्या पीव्हीआर आंतरराज्य जलतरण स्पर्धेची सांगता , नंदिनी पेटकर व अमन सूनगार ठरले जलद जलतरणपटू, स्विमर्स क्लब बेळगाव सर्वकष विजेते, आबा स्पोर्ट्स क्लब उपविजेते

तिसऱ्या पीव्हीआर आंतरराज्य जलतरण स्पर्धेची सांगता , नंदिनी पेटकर व अमन सूनगार ठरले जलद जलतरणपटू, स्विमर्स क्लब बेळगाव सर्वकष विजेते, आबा स्पोर्ट्स क्लब उपविजेते

बेळगाव : गोवावेस येथील महानगरपालिकेच्या जलतरण तलावात रविवार दिनांक 8 रोजी आबा हिंद स्पोर्ट्स क्लब व क्रीडा भारती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या तिसऱ्या पीव्हीआर आंतरराज्य निमंत्रित जलतरण स्पर्धेची उत्साहात सांगता झाली. या स्पर्धेत विविध राज्यांतून सहभागी झालेल्या जलतरणपटूंनी उल्लेखनीय कामगिरी करत अनेक नवे विक्रम प्रस्थापित केले.

स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर महिला गटात नंदिनी पेटकर (ब्ल्यू वॉटर अकॅडमी, पुणे) तर पुरुष गटात अमन सूनगार (डॉल्फिन क्लब, बेंगळूर) यांनी जलद जलतरणपटूचा मान पटकावला. संघात्मक कामगिरीत स्विमर्स क्लब बेळगाव यांनी सर्वकष विजेतेपदावर आपले नाव कोरले, तर आबा स्पोर्ट्स क्लब बेळगाव उपविजेते ठरले.

स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाला जायंट्स ग्रुप ऑफ बेलगाम मेनचे अध्यक्ष श्री. लक्ष्मण शिंदे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. क्रीडा भारती दक्षिण प्रांतचे प्रमुख श्री. चंद्रशेखर जहागीरदार, श्री. बसवराज, आबा क्लबचे अध्यक्ष श्री. शितल हुलबते, जायंट्स ग्रुपचे माजी अध्यक्ष श्री. शिवराज पाटील, नवहिंद क्रीडा केंद्राचे वाय. सी. गोरल, जलतरण प्रशिक्षक विश्वास पवार, सचिव सौ. शुभांगी मंगळूरकर व ज्योती पवार यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना प्रशस्तीपत्रे, पदके व ट्रॉफी प्रदान करण्यात आल्या.

महिला गटात ओपन गटात नंदिनी पेटकर (33 गुण) यांनी विजेतेपद मिळवले. गट क्रमांक एकमध्ये श्रीलेखा पारेख (35 गुण), गट क्रमांक दोनमध्ये दक्षता दुबे (35 गुण), गट क्रमांक तीनमध्ये अद्विका सोनी (35 गुण) सर्व ब्ल्यू वॉटर अकॅडमी, पुणे, तर गट क्रमांक चारमध्ये एलिना कोष्टा परेरा (फिट फॉर लाईफ, गोवा – 29 गुण) आणि गट क्रमांक पाचमध्ये क्रिशा कुलकर्णी (स्विमर्स क्लब बेळगाव – 19 गुण) यांनी यश संपादन केले.

पुरुष गटात ओपन गटात अमन सूनगार (31 गुण) यांनी अव्वल स्थान मिळवले. गट क्रमांक एकमध्ये सार्थक श्रेयकर (31 गुण), गट क्रमांक दोनमध्ये वेदांत मिसाळे (30 गुण), गट क्रमांक तीनमध्ये रियांश संधू (29 गुण) सर्व स्विमर्स क्लब व पॅशिओनेट अकॅडमी बेळगाव, तर गट क्रमांक चारमध्ये अद्वैत जोशी (आबा स्पोर्ट्स क्लब बेळगाव – 35 गुण) आणि गट क्रमांक पाचमध्ये नमन पाटील (स्विमर्स क्लब बेळगाव – 18 गुण) यांनी आपली चमक दाखवली.

ही स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी आबा हिंद स्पोर्ट्स क्लबचे प्रशिक्षक विश्वास पवार, अमित जाधव, रणजीत पाटील, संदीप मोहिते, मारुती घाडी, शुभांगी मंगळूरकर, ज्योती पवार, विजया शिरसाठ, शिवराज मोहिते, किशोर पाटील, विशाल वेसणे, अमित कुडची, कलाप्पा पाटील, वैभव खानोलकर, सुधीर धामणकर, सतीश धनुचे, राहुल काकतकर, सुनील जाधव, मिस्टर केस्टीकर, संजय मरगाळे, स्नेहल धामणकर, गौरी जूवळी, प्रसन्ना बसूतकर, स्वाती जाधव, राजश्री पाटील, गौरी बेळगोजी, विजय नाईक, भरत पाटील, विजय बोगन, ओम घाडी, प्रांजल सुळधाळ व राजू कडेमनी यांच्यासह सर्व स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ten − one =

error: Content is protected !!