कुत्र्याच्या चाव्याने वृद्ध महिला जखमी; उपनगरीय भागातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

कुत्र्याच्या चाव्याने वृद्ध महिला जखमी; उपनगरीय भागातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

बेळगाव : शहरातील विजयनगर पाईपलाइन रोड परिसरात कुत्र्याच्या चाव्याची घटना घडली असून, या घटनेत एक वृद्ध महिला जखमी झाली आहे. सुदैवाने या घटनेत महिलेला किरकोळ दुखापत झाली असून, त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित वृद्ध महिला नेहमीप्रमाणे परिसरात चालण्यासाठी बाहेर पडली असताना अचानक कुत्र्याने तिच्यावर हल्ला केला. परिसरातील नागरिकांनी तत्काळ धाव घेतल्याने आणि महिलेला वेळेत वैद्यकीय उपचार मिळाल्याने ती थोडक्यात बचावली.

या घटनेनंतर उपनगरीय भागात भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे. विजयनगर, पाईपलाइन रोडसह आसपासच्या भागात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

अशा घटना वारंवार घडत असतानाही महानगरपालिकेकडून ठोस उपाययोजना केल्या जात नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून होत आहे. कुत्र्यांच्या निर्बंध, नसबंदी आणि पुनर्वसन याबाबत प्रभावी कारवाई कधी होणार, असा सवाल उपस्थित केला जात असून, “महानगरपालिका याकडे लक्ष देणार का?” हा प्रश्न नागरिक विचारत आहेत.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ten + fourteen =

error: Content is protected !!