बेळगाव | दि. 07 फेब्रुवारी 2026
एपीएमसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी चोरीप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून एकूण पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. जप्त केलेल्या दुचाकींची एकूण किंमत सुमारे १ लाख २५ हजार रुपये इतकी आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि. 24 डिसेंबर 2025 रोजी बेळगाव येथील कांग्राळी के.एच. परिसरात राहणारे श्री सतीश मल्लप्पा मुतगेकर यांनी आपली हिरो होंडा स्प्लेंडर दुचाकी (क्रमांक KA-22/Y-6732) चोरीस गेल्याची तक्रार एपीएमसी पोलीस ठाण्यात दाखल केली होती. या तक्रारीनुसार एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 170/2025 अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम 303(2) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला होता.
या प्रकरणाच्या तपासादरम्यान बाजार उपविभागाचे सहायक पोलीस आयुक्त श्री संतोष सत्यनायिक यांच्या मार्गदर्शनाखाली, एपीएमसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री वाय.एस. अवटी यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. तपासादरम्यान पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे:
- सैफअली शेरअली नागारजी (वय 25), रा. दर्गा गल्ली, निपाणी, जि. बेळगाव
- नेहान @ अनीश mohasin मुजावर (वय 18), रा. भीमनगर, निपाणी, जि. बेळगाव
चौकशीत आरोपींनी दुचाकी चोरी केल्याची कबुली दिल्यानंतर त्यांच्याकडून पुढील दुचाकी जप्त करण्यात आल्या:
- हिरो होंडा स्प्लेंडर – किंमत ₹15,000
- सुझुकी अॅक्सेस स्कूटर – किंमत ₹30,000
- सुझुकी अॅक्सेस स्कूटर – किंमत ₹30,000
- स्प्लेंडर प्लस – किंमत ₹25,000
- स्प्लेंडर प्लस – किंमत ₹25,000
या प्रकरणी पुढील तपास सुरू असून आरोपींविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
ही यशस्वी कारवाई करणाऱ्या पथकात पोलीस निरीक्षक श्री वाय.एस. अवटी, पीएसआय श्री एस.आर. मुत्ती, एएसआय श्री एम.ए. पाटील, श्री बसवराज नरगुंद, श्री खादरसाब खानमन्नावर, श्री गोविंदप्पा पूजार, श्री रफीक मुजावर, श्री रमेश पाटील तसेच तांत्रिक विभागातील कर्मचारी श्री रमेश अक्की व श्री महादेव यांचा समावेश होता.
या उत्कृष्ट कामगिरीबद्दल बेळगाव शहराचे पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित पोलिस पथकाचे कौतुक केले आहे.
