बेळगाव : भारत सरकारच्या क्रीडा खात्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय नॅशनल हॉकी चॅम्पियनशिप २०२६ स्पर्धेसाठी हॉकी बेळगावचा मुला व मुलींचा संघ नवी दिल्लीकडे रवाना झाला आहे. ही स्पर्धा ५ फेब्रुवारी ते १० फेब्रुवारी दरम्यान नवी दिल्लीतील राजीव गांधी क्रीडा मैदानावर होणार आहे.
मुलींच्या संघात प्राजक्ता निलजकर, भावना किलारकी, विजयालक्ष्मी मुलीमनी, खुषी गुरव, वैष्णवी मावळणकर, नेत्रा गुरव, संपदा कणबरकर, मनीषा शिगीहळ्ळी, सुकृती कासार, प्रतीक्षा गुरव, निकिता कावळेकर, प्रणाली डुकरे, भूमि कुगजी, अनिता पम्मार, बीबी जाहिरा मुल्ला, सुकृती हिरेमठ, निधी पाटील, संजोता चौगुले, यशिका कराडे व निर्मला मल्लडी यांचा समावेश आहे.
मुलांच्या संघात प्रशांत कराडे, चेतन दोडमनी, सागर बबली, शशांक कुरपे, श्लोक मराठे, अभिषेक कोकणी, आनंद भांटे, पुनीत कग्गणगी, मंजुनाथ नाईक, निखिल बागडी, प्रेम पितांबी, अभिषेक दोडमनी, आदर्श आमटी, सुरज हुडेद, गणेश कोरे, शुभम नायक, दर्शन बस्तवाड, यश पाटील, दर्शन नंदेश्वर, विवेक संगणनावर, मल्लिकार्जुन दरेनावर, वरुण कोलकार व विशाल कोलकार यांचा समावेश आहे.
संघाच्या रवाना प्रसंगी हॉकी बेळगावचे अध्यक्ष गुळाप्पा होसमनी व उपाध्यक्ष प्रकाश कालकुंद्रीकर यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. यावेळी सचिव सुधाकर चाळके, संघ व्यवस्थापक सविता वेसणे, प्रशिक्षक राजू यल्लाप्पा देशनूर, उत्तम शिंदे व संतोष दरेकर आदी उपस्थित होते.
