सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचा उद्योजकांसाठी विशेष कार्यक्रम ८ फेब्रुवारीला बेळगावात

सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचा उद्योजकांसाठी विशेष कार्यक्रम ८ फेब्रुवारीला बेळगावात

बेळगाव : मराठी उद्योजकांना एकत्र आणून त्यांच्या व्यवसायवृद्धीसाठी कार्य करणारी सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट (SCGT) ही ना-नफा संस्था बेळगावात विशेष नेटवर्किंग व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करत आहे. हा कार्यक्रम रविवारी ८ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ४ ते ६ या वेळेत सन्मान हॉटेल, बेळगाव येथे होणार आहे.

माधवराव भिडे यांनी स्थापन केलेल्या सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे मुख्य उद्दिष्ट मराठी उद्योजक, लघुउद्योग आणि व्यावसायिकांमध्ये परस्पर सहकार्य वाढवून ‘एकमेकां साह्य करू, अवघे होऊ श्रीमंत’ या ब्रीदवाक्यानुसार सर्वांगीण प्रगती साधणे हे आहे. या संस्थेमार्फत नियमित नेटवर्किंग मीटिंग्स, व्यावसायिक संदर्भ (रेफरल्स), अनुभवी उद्योजकांचे मार्गदर्शन, प्रशिक्षण कार्यक्रम तसेच विविध उद्योगांसाठी स्वतंत्र बिझनेस सेल्स कार्यरत आहेत.

या कार्यक्रमात उद्योजकांना एकमेकांशी संवाद साधण्याची, व्यवसायाच्या नव्या संधी ओळखण्याची तसेच अनुभवी उद्योजकांकडून मार्गदर्शन घेण्याची संधी मिळणार आहे. सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचा विस्तार केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित नसून जागतिक स्तरावर मराठी उद्योजकांचे भक्कम जाळे उभे राहत आहे.

बेळगाव व परिसरातील मराठी उद्योजक, व्यावसायिक आणि नवउद्योजकांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट, बेळगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

19 + fourteen =

error: Content is protected !!