बेळगाव शहरात अवैध दारू विक्री व गांजा सेवनप्रकरणी दोन जण अटकेत

बेळगाव शहरात अवैध दारू विक्री व गांजा सेवनप्रकरणी दोन जण अटकेत

बेळगाव : शहरातील मारीहाळ आणि खडेबाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत ५ फेब्रुवारी २०२६ रोजी घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये पोलिसांनी कारवाई करत अवैध दारू विक्रीप्रकरणी व गांजा सेवनप्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे.

मारीहाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत सांब्रा गावातील शुक्रवारी पेठ परिसरात कोणताही परवाना नसताना सार्वजनिक ठिकाणी अवैधरीत्या दारू विक्री करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत संदीप रामचंद्र नायक (वय ३९, रा. महादेव नगर, सांब्रा, बेळगाव) याला अटक करण्यात आली. आरोपीकडून बेंगळुरू रम व बेंगळुरू व्हिस्की अशा एकूण ४०० रुपये किमतीची अवैध दारू जप्त करण्यात आली. या प्रकरणी मारीहाळ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १२/२०२६ अन्वये अबकारी कायदा १९६५ च्या कलम १५(ए) व ३२(३) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.

दुसऱ्या घटनेत खडेबाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत शिवाजी रोडवरील बेल्चिक चिकन सेंटरजवळ सार्वजनिक ठिकाणी गांजा सेवन करत असलेला मुजाहिद वहीद अहमद नायकवाडी (वय २८, रा. ४था क्रॉस, न्यू गांधीनगर, बेळगाव) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. संशयिताची वैद्यकीय तपासणी करून त्याच्याविरुद्ध खडेबाजार पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ०९/२०२६ अन्वये एनडीपीएस कायद्याच्या कलम २७(ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या दोन कारवायांमध्ये एकूण दोन आरोपींना अटक करण्यात आली असून ४०० रुपये किमतीची अवैध दारू जप्त करण्यात आली आहे. ही यशस्वी कारवाई केल्याबद्दल संबंधित पीएसआय व पोलिस कर्मचाऱ्यांचे बेळगाव शहराचे पोलीस आयुक्त तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

two × two =

error: Content is protected !!