खासगी क्षणांचे व्हिडिओ काढून ५० लाखांची खंडणी मागणाऱ्या तिघांना माळमारुती पोलिसांकडून अटक.

खासगी क्षणांचे व्हिडिओ काढून ५० लाखांची खंडणी मागणाऱ्या तिघांना माळमारुती पोलिसांकडून अटक.

बेळगाव : एखाद्या व्यक्तीचे खासगी क्षण चित्रीत करून त्याचा गैरवापर करत ब्लॅकमेल करून ५० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या तिघा आरोपींना माळमारुती पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी अटक केली आहे.

आरोपींनी फिर्यादीचे खासगी क्षण गुप्तपणे व्हिडिओत चित्रित केले होते. हे व्हिडिओ सोशल मीडियावर तसेच न्यूज चॅनल्सवर प्रसारित करण्याची धमकी देत त्यांनी फिर्यादीकडून ५० लाख रुपयांची मागणी केली होती. याप्रकरणी माळमारुती पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ३०८(२), ७७, ३५१ तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा २००० अंतर्गत कलम ६६(ई), ६७ व ६७(ज) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणाचा तपास एसीपी मार्केट उपविभाग बेळगावचे श्री. संतोष सत्यनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली माळमारुती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. बी. आर. गड्डेकर यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने केला.

पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे —

  1. समीअर निसार अहमद शेख (वय ३२), रा. जलाल गल्ली, गोकाक
  2. अब्दुलरशीद नजीर अहमद मकानदार (वय ५१), रा. योगिकोल्ल, गोकाक
  3. मोहम्मद दिलावर बाळेकुंद्री (वय ४३), रा. घटप्रभा, गोकाक

पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली मोठ्या प्रमाणात साधनसामग्री जप्त केली आहे. यात व्हिवो २७ मोबाईल, सॅमसंग गॅलेक्सी एस २५ अल्ट्रा व एस २२ अल्ट्रा मोबाईल, ६४ जीबी पेनड्राइव्ह, विविध मेमरी कार्ड्स व रीडर्स, सहा हिडन कॅमेरा होल्डर्स, तसेच टोयोटा इनोव्हा क्रिस्टा (क्रमांक KA-49-N-8055) या कारचा समावेश आहे.

या यशस्वी कारवाईत डॉ. भानुप्रकाश जे. (प्रो. IPS), पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर, पीएसआय होन्नप्पा तलवार, उदय पाटील, पी. एम. मोहिते तसेच पोलीस कर्मचारी अरुण कांबळे, सी. एल. चिगरी, मारुती कुरेरे, के. बी. गौराणी, संदीप नडगेरी, गोपाळ लट्टी, मंजुनाथ माळेद, महेश वडयार, हनुमंत दोडुगोळ, शिवानंद हुकेरी आणि तांत्रिक विभागाचे रमेश अक्की व महादेव काशीद यांचा सहभाग होता.

या संपूर्ण कारवाईचे पोलीस आयुक्त, बेळगाव शहर तसेच डीसीपी यांनी विशेष कौतुक केले आहे.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

11 + 5 =

error: Content is protected !!