कर्तव्यावर असताना अंबालामध्ये वाहन दुर्घटनेत कंग्राळी (के.एच.) येथील जवान जगदीश शिंदे यांचे निधन

कर्तव्यावर असताना अंबालामध्ये वाहन दुर्घटनेत कंग्राळी (के.एच.) येथील जवान जगदीश शिंदे यांचे निधन

कंग्राळी (के.एच.) गावचे सुपुत्र व भारतीय सैन्यात कार्यरत असलेले जवान जगदीश शिंदे यांचा अंबाला (हरियाणा) येथे कर्तव्यावर असताना वाहन दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना दिनांक २ फेब्रुवारी रोजी घडली.

जवान जगदीश शिंदे यांचे पार्थिव ४ फेब्रुवारी रोजी बेळगाव येथे आणण्यात येणार असून, त्यानंतर त्यांच्या मूळ गावी कंग्राळी (के.एच.) येथे लष्करी सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

जगदीश शिंदे हे अत्यंत कर्तव्यदक्ष, शिस्तप्रिय व देशसेवेसाठी सदैव तत्पर होते. त्यांच्या अकाली निधनामुळे कंग्राळी (के.एच.) गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले तसेच आई-वडील असा परिवार आहे. या दुःखद घटनेमुळे शिंदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, सर्व स्तरातून शोकसंवेदना व्यक्त केल्या जात आहेत.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

4 × four =

error: Content is protected !!