शांताई वृद्धाश्रम, बेळगाव येथे मूर्ती प्रतिष्ठापना व भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न होणार

शांताई वृद्धाश्रम, बेळगाव येथे मूर्ती प्रतिष्ठापना व भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न होणार

बेळगाव : शांताई वृद्धाश्रम, बेळगाव यांच्या वतीने श्री स्वामी समर्थ तसेच श्री विठ्ठल–रखुमाई यांच्या मूर्ती प्रतिष्ठापना (प्राणप्रतिष्ठापना) सोहळ्यासह नव्या इमारतीचे भूमिपूजन बुधवार, दि. ४ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आले आहे. या धार्मिक व सामाजिक दृष्ट्या महत्त्वाच्या कार्यक्रमास भाविक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

या सोहळ्याची सुरुवात सकाळी ९ वाजता भव्य शोभायात्रेने होणार असून ही शोभायात्रा बामणवाडी गावातून आश्रमापर्यंत निघणार आहे. त्यानंतर दुपारी १२ वाजता श्री स्वामी समर्थ व श्री विठ्ठल–रखुमाई मूर्ती प्रतिष्ठापना व भूमिपूजन विधी संपन्न होणार आहे. दुपारी १ वाजल्यापासून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

सायंकाळी ४ वाजता अजार वारीकरी मंडळीतर्फे भजन-कीर्तनाचा कार्यक्रम होणार असून संपूर्ण परिसर भक्तीमय वातावरणात न्हाऊन निघणार आहे.

वृद्धांसाठी असलेल्या शांताई वृद्धाश्रमाच्या नव्या इमारतीच्या विस्तारामुळे अधिक सुविधा उपलब्ध होणार असून या पवित्र सोहळ्यास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन कार्याध्यक्ष श्री. विजय मोरेसंपूर्ण शांताई आश्रम परिवारातर्फे करण्यात आले आहे.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

eleven + 15 =

error: Content is protected !!