कॅम्प पोलिसांकडून घरफोडी प्रकरणाचा छडा; १५ लाखांचे १०२ ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त

कॅम्प पोलिसांकडून घरफोडी प्रकरणाचा छडा; १५ लाखांचे १०२ ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त

बेळगाव : दिनांक २८ जानेवारी रोजी सिलिन ऑस्कर डिसोजा (रा. खानापूर रोड, कॅम्प, बेळगाव) यांनी कॅम्प पोलिस ठाण्यात हजर राहून आपल्या घरात चोरी झाल्याची तक्रार दिली होती. या तक्रारीनुसार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक १०/२०२६ अन्वये कलम ३०६ बीएनएस अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला होता.

या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिस आयुक्त बेळगाव शहर भूषण बोरसे, डीएसपी एन. व्ही. बरमणी, डीएसपी निरंजन राजेअरस तसेच एसीपी कडे बाजार उपविभागाचे शेखरप्पा यांच्या मार्गदर्शनाखाली कॅम्प पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आनंद वनकुंद्री यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली होती.

या विशेष पथकाने तपास करताना कामाक्षी संजय बोगे (वय ४५, रा. मोची गल्ली, तेलुगू कॉलनी, कॅम्प) व रमेजा अब्दुलमजीद बेपारी (वय ५७, रा. काकर्स स्ट्रीट, कॅम्प, बेळगाव) या दोन आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीत आरोपींनी फिर्यादीच्या घरात चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून एकूण १०२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले असून त्यांची किंमत सुमारे १५ लाख रुपये इतकी आहे.

या कारवाईत सहभागी झालेल्या पीएसआय ए. रुक्मिणी, पीएसआय बसवराज उजीणकोप, हेड कॉन्स्टेबल मनुवळ्ली, महिला कॉन्स्टेबल गौरी मठद तसेच तांत्रिक विभागातील एस. अक्की व एम. एस. काशीद यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली. त्यांच्या या यशस्वी कार्याबद्दल मान्यवर पोलिस आयुक्त भूषण बोरसे यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

one + 20 =

error: Content is protected !!