बेळगाव शहरात पोलिसांची धडक कारवाई; अवैध दारू, मटका, गांजा व वाहनचोरी प्रकरणांत 8 आरोपी अटकेत

बेळगाव शहरात पोलिसांची धडक कारवाई; अवैध दारू, मटका, गांजा व वाहनचोरी प्रकरणांत 8 आरोपी अटकेत

बेळगाव : बेळगाव शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत 31 जानेवारी 2026 रोजी पोलिसांनी राबविलेल्या विशेष कारवाईत अवैध दारू विक्री, मटका जुगार, गांजा सेवन तसेच वाहनचोरी प्रकरणांत एकूण 7 आरोपींना अटक करून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त केला आहे.

उद्यमबाग पोलीस ठाणे
उद्यमबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत ख

खादरवाडी क्रॉसजवळ सार्वजनिक ठिकाणी गोव्यामध्ये विक्रीसाठी असलेली विदेशी दारू कोणताही परवाना नसताना बेकायदेशीररीत्या वाहतूक व विक्री करताना

  1. विकास गणपती बुट्टप्पागोल (रा. तुक्कानट्टी सध्या सोमवारी पेठ, टिळकवाडी, बेळगाव)
  2. आदित्य मल्लप्पा दोडवाड (रा. बैलहोंगल, सध्या कावेरी कॉलनी, मंडोळी)
    यांना अटक करण्यात आली. आरोपींकडून 15 लिटर विदेशी दारू, रोख रक्कम 6,200 रुपये व गुन्ह्यात वापरलेली कार (क्र. KA-49/N-9495) असा सुमारे 15,06,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी उद्यंबाग पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 09/2026 अंतर्गत अबकारी कायद्याच्या कलम 32, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

मारिहाळ पोलीस ठाणे
मारिहाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत करडिगुडी गावाजवळ सार्वजनिक ठिकाणी मटका जुगार खेळताना
सिद्धय्या बसलिंगय्या पूजारी (रा. करडिगुडी, बेळगाव)
यास अटक करण्यात आली. आरोपीकडून 2,530 रुपये रोख रक्कम व जुगार साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकरणी मारिहाळ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 11/2025 अंतर्गत कलम 78(iii) के.पी. अ‍ॅक्टनुसार कारवाई करण्यात आली आहे.

सीसीबी (CCB) – वाहनचोरी प्रकरण
बेळगाव शहरात वाढत्या वाहनचोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावत सीसीबी पोलिसांनी
संजू मल्लप्पा मेखळी (वय 25, रा. बेणकनहळी, ता. हुकेरी, जि. बेळगाव)
या सराईत वाहनचोराला अटक केली. आरोपीकडून चोरीची अशोक लेलँड डोस्ट वाहन (गुन्हा क्र. 10/2026, मार्केट पोलीस ठाणे) व होंडा डिओ स्कूटर (गुन्हा क्र. 72/2025, खडेबाजार पोलीस ठाणे) अशी एकूण 2,78,000 रुपयांची वाहने जप्त करण्यात आली. आरोपीविरुद्ध संबंधित पोलीस ठाण्यांत पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

हिरबागेवाडी व टिळकवाडी पोलीस ठाणे – गांजा सेवन प्रकरण
हिरबागेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत

  1. बसवराज यल्लप्पा मरगनाचे (रा. तानाजी गल्ली, बस्तवाड)
  2. लक्ष्मण परशराम बांदगी (रा. तानाजी गल्ली, बस्तवाड)
    यांना सार्वजनिक ठिकाणी गांजा सेवन करताना अटक करण्यात आली.

तसेच टिळकवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत
3) राहुल अशोक मजुकर (रा. बांदूर गल्ली, अनगोळ)
4) शहीद अब्दुलरजाक हुदली (रा. अंबेडकर गल्ली, अनगोळ)
यांना गांजा सेवन करताना ताब्यात घेण्यात आले. सर्व आरोपींची वैद्यकीय तपासणी करून त्यांच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्याच्या कलम 27(b) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

या एकत्रित कारवाईत पोलिसांनी एकूण 7 गुन्हे दाखल करून 8 आरोपींना अटक केली असून अवैध दारू, रोख रक्कम, कार, चोरीची वाहने व जुगार साहित्य असा मोठा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई करणारे संबंधित पोलीस निरीक्षक व कर्मचाऱ्यांचे बेळगाव शहर पोलीस आयुक्त व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विशेष कौतुक केले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

19 − 6 =

error: Content is protected !!