श्री क्षेत्र दक्षिण काशी कपिलेश्वर देवस्थानतर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

श्री क्षेत्र दक्षिण काशी कपिलेश्वर देवस्थानतर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

बेळगाव :
“रक्तदान हेच जीवनदान” या उदात्त विचारातून समाजातील गरजू रुग्णांना मदतीचा हात देण्यासाठी श्री क्षेत्र दक्षिण काशी कपिलेश्वर देवस्थान, बेळगाव यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर रक्तदान शिबिर सोमवार, दिनांक २ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत कपिलेश्वर देवस्थान परिसरात आयोजित करण्यात आले आहे.

सध्याच्या काळात रुग्णालयांमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत असून, या पार्श्वभूमीवर हे रक्तदान शिबिर समाजोपयोगी ठरणार आहे. एका रक्तदात्याच्या रक्तदानामुळे तब्बल तीन रुग्णांचे प्राण वाचू शकतात. तसेच रक्तदानामुळे शरीरातील नवीन रक्तपेशी निर्माण होण्यास मदत होते, हृदयाचे आरोग्य सुधारते आणि आरोग्याची प्राथमिक तपासणीही होते.

रक्तदानासाठी येणाऱ्या दात्यांनी सोबत आधार कार्ड किंवा कोणतेही वैध ओळखपत्र आणणे आवश्यक आहे. तसेच रक्तदानापूर्वी हलका नाश्ता करून येण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

मानवतेच्या या पवित्र कार्यात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन श्री क्षेत्र दक्षिण काशी कपिलेश्वर देवस्थान, बेळगाव व समस्त भक्त परिवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

20 + 14 =

error: Content is protected !!