टिळकवाडी पोलीस ठाणे हद्दीत सोनसाखळी चोरी प्रकरणी आरोपी अटकेत

टिळकवाडी पोलीस ठाणे हद्दीत सोनसाखळी चोरी प्रकरणी आरोपी अटकेत

बेळगाव शहरातील टिळकवाडी पोलीस ठाणे हद्दीतील देशमुख रोडवरील आरपीडी सर्कलजवळ असलेल्या उदय भवन हॉटेल परिसरात सोनसाखळी चोरीची घटना घडली होती. या प्रकरणी टिळकवाडी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीस अटक केली आहे.

या संदर्भात टिळकवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 133/2025 अन्वये कलम 303(2) बीएनएस–2023 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. उपविभागीय सहायक पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत असून, पोलीस निरीक्षक श्री. परशुराम पुजेरी यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 29 जानेवारी 2026 रोजी आरोपीस अटक करण्यात आली.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव अविनाश रुद्रप्पा ऐरसंग (वय 39), रा. कल्याण नगर, उत्तराधिकारी मठाजवळ, विद्यानगर, हुबळी असे आहे. चौकशीदरम्यान आरोपीकडून पुढील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सोन्याची साखळी – वजन 8.48 ग्रॅम, अंदाजे किंमत ₹95,000/-
ग्रे रंगाचा मोटो जी-5 एस प्लस मोबाईल – अंदाजे किंमत ₹8,000/-

अशा प्रकारे एकूण ₹1,03,000/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपीविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक श्री. परशुराम पुजेरी, पीएसआय श्री. विश्वनाथ घंटामठ (कायदा व सुव्यवस्था), पीएसआय श्री. प्रभाकर डोळी (गुन्हे व तपास) तसेच पोलीस कर्मचारी महेश पाटील, एस.एम. करलिंगण्णावर, नागेंद्र तळवार, सतीश गिरी, लाडजीसाब मुल्लाणी आणि तांत्रिक विभागातील राकेश अक्की व महादेव कासिद यांच्या पथकाने केली.

आरोपीस अटक करून मुद्देमाल जप्त केल्याबद्दल टिळकवाडी पोलीस ठाण्याच्या पथकाच्या कामगिरीचे माननीय पोलीस आयुक्त, बेळगाव शहर तसेच डीसीपी यांनी कौतुक केले आहे.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

fifteen − six =

error: Content is protected !!