अनमोड घाटात रस्ता खचला; बेळगाव–गोवा महामार्गावरील वाहतूक विस्कळीत – जड वाहनांसाठी २ सप्टेंबरपर्यंत बंद

अनमोड घाटात रस्ता खचला; बेळगाव–गोवा महामार्गावरील वाहतूक विस्कळीत – जड वाहनांसाठी २ सप्टेंबरपर्यंत बंद

दूधसागरजवळ मोठी दुर्घटना; प्रवासी बस व आपत्कालीन वाहनांनाच मुभा

बेळगाव, ६ जुलै २०२५:
सततच्या मुसळधार पावसामुळे अनमोड घाटातील बेळगाव–गोवा महामार्गावरील एक भाग खचल्याने वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे. ही घटना दूधसागर मंदिराजवळ, मोल्लेमपासून अवघ्या १० कि.मी. अंतरावर घडली असून, यापूर्वी येथे तडे जाण्याच्या खुणा दिसून आल्या होत्या.

प्रशासनाकडून आवश्यक खबरदारी घेण्यात आली होती, मात्र मुसळधार पावसाच्या तीव्रतेपुढे दुरुस्तीचे प्रयत्न अपुरे ठरले. सध्या महामार्गावरील वाहतूक फक्त एका लेनद्वारे सुरू आहे. पोलिसांकडून वाहतूक नियंत्रणासाठी तैनातगी करण्यात आली असून, वाहनचालकांना काळजीपूर्वक व सुरक्षितपणे प्रवास करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जड वाहनांसाठी बंदी; २ सप्टेंबरपर्यंत निर्बंध लागू
परिस्थितीचा अंदाज घेता, प्रशासनाने २ सप्टेंबर २०२५ पर्यंत सर्व जड वाहनांची (ट्रक, मालवाहू वाहने) वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या फक्त प्रवासी वाहतूक करणाऱ्या बस व आपत्कालीन सेवा वाहनांनाच घाटमार्गावरून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. या निर्णयामुळे काही प्रमाणात वाहतुकीचा भार कमी होईल आणि दुरुस्ती कार्याला वेग येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

रस्त्यांची स्थिती चिंताजनक — आणखी खबरदारीची गरज
या प्रकारामुळे घाट परिसरातील रस्त्यांची अस्थिरता पुन्हा ऐरणीवर आली आहे. सततच्या पावसामुळे असे अपघात वाढण्याची शक्यता लक्षात घेता, संबंधित यंत्रणांनी पूर्वतयारी व नियमित देखरेख याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

one × one =

error: Content is protected !!