बेळगाव : अनसुरकर गल्ली, बेळगाव येथील कॅपिटल-वन संस्थेतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही एसएसएलसी विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. बेळगाव आणि परिसरातील शालेय परीक्षेत पहिले पाच क्रमांक मिळविलेले विद्यार्थी तसेच शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले पाच विद्यार्थी या व्याख्यानमालेचा विशेष लाभ घेऊ शकणार आहेत.
ही व्याख्यानमाला रविवार, 16 नोव्हेंबर 2025 ते रविवार, 21 डिसेंबर 2025 या कालावधीत दर रविवारी सकाळी 8.15 ते 12.00 या वेळेत होणार आहे.
उद्घाटन सोहळा 16 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजता ज्योती महाविद्यालयाच्या सभागृहात, संचालक मंडळ व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन शिवाजीराव हंडे यांनी दिली.
व्याख्यानमालेचे वेळापत्रक
| दिनांक | वेळ | विषय |
|---|---|---|
| 16-11-2025 | 8.15 ते 12.00 | मराठी |
| 23-11-2025 | 8.15 ते 12.00 | गणित |
| 30-11-2025 | 8.15 ते 12.00 | इंग्रजी |
| 07-12-2025 | 8.15 ते 12.00 | कन्नड |
| 14-12-2025 | 8.15 ते 12.00 | विज्ञान |
| 21-12-2025 | 8.15 ते 12.00 | समाजविज्ञान |
शहरातील शाळांमधून आलेल्या नोंदणीप्रमाणे मोठ्या संख्येने विद्यार्थी या व्याख्यानमालेत सहभागी होणार असून सर्व विद्यार्थ्यांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
