बेळगाव : ४१व्या राज्यस्तरीय रोलर स्केटिंग स्पर्धेत बेळगावच्या स्केटर्सनी अप्रतिम कामगिरी करत एकूण २६ पदके पटकावली आहेत. या स्पर्धा तुमकुर आणि बेंगलोर येथे पार पडल्या असून, संपूर्ण कर्नाटक राज्यातील तब्बल २०० हून अधिक अव्वल स्केटर्सनी यात सहभाग घेतला होता.
बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनतर्फे निवड झालेल्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत १३ सुवर्ण, ८ रौप्य आणि ३ कांस्य अशी एकूण २६ पदकांची कमाई केली.
पदक विजेते स्केटर्स पुढीलप्रमाणे आहेत:
देवेन बामणे (१ सुवर्ण), साईराज मेंडके (२ सुवर्ण), हिरेन राज (१ सुवर्ण, १ रौप्य), दृष्टी अंकले (१ सुवर्ण, १ रौप्य), अवनीश कोरिशेट्टी (१ सुवर्ण, १ रौप्य), मनन अंबीगा (१ सुवर्ण), जयध्यान राज (२ रौप्य), रश्मीता अंबीगा (२ रौप्य), अभिषेक नावले (१ रौप्य), खुशी आगशिमनी (२ रौप्य), अथर्व हडपद (१ कांस्य), अन्वी सोनार (१ सुवर्ण), शेफाली शंकरगौडा (१ सुवर्ण), खुशी घोटीवरेकर (१ सुवर्ण), सई शिंदे (१ सुवर्ण), मुद्दलसिका मुलाणी (१ सुवर्ण) आणि आहद मुलाणी (१ सुवर्ण).
हे सर्व स्केटर्स के.एल.ई. सोसायटी स्केटिंग रिंग आणि गुड शेफर्ड स्केटिंग रिंग येथे प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, मंजुनाथ मंडोलकर, विठ्ठल गंगणे आणि योगेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतात.
या विजयी स्केटर्सना डॉ. प्रभाकर कोरे, माजी आमदार शाम घाटगे, राज घाटगे, उमेश कलघटगी, प्रसाद तेंडुलकर तसेच कर्नाटक रोलर स्केटिंग असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी इंदुधर सीताराम यांचे प्रोत्साहन लाभले आहे.
🏅 बेळगावच्या स्केटर्सनी पुन्हा एकदा सिद्ध केले की प्रतिभा आणि मेहनतीच्या जोरावर राज्य पातळीवर बेळगावचा झेंडा उंचावता येतो!
#Belgav #BedhadakBelgav
