📍गोकाक | प्रतिनिधी
महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सिमाभागच्या शिष्टमंडळाने बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. सतीश जारकीहोळी यांची गोकाक येथील निवासस्थानी भेट घेऊन सिमाभागात वाढत चाललेल्या कन्नड सक्तीविरोधात सविस्तर निवेदन सादर केले.
शिष्टमंडळाचे नेतृत्व अध्यक्ष शुभम शेळके यांनी करताना सांगितले की, मराठी भाषिकांवर कानडी सक्ती लादण्याचा निर्णय हा अन्यायकारक असून, हा आदेश सिमाभागासारख्या वादग्रस्त भागात लागू करणे अयोग्य आहे. त्यामुळे या भागाला या आदेशातून वगळण्यात यावे, अशी स्पष्ट विनंती त्यांनी केली.
शेळके यांनी यावेळी इशारा दिला की, “जर ही सक्ती थांबवली गेली नाही, तर आम्ही रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्यास भाग पाडले जाऊ. याचे गंभीर पडसाद महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांमध्ये उमटतील.”
पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी निवेदनाची गांभीर्याने दखल घेत कार्यकर्त्यांना आश्वासन दिले की, “या संदर्भात सविस्तर माहिती घेऊन योग्य निर्णय घेतला जाईल आणि मराठी भाषिक नागरिकांवर कोणताही अन्याय होणार नाही याची मी खात्री देतो.”
यावेळी कार्याध्यक्ष धनंजय पाटील, सरचिटणीस मनोहर हुंदरे, खजिनदार व नगरसेवक शिवाजी मंडोळकर, उपाध्यक्ष प्रविण रेडेकर, चंद्रकांत पाटील, महादेव पाटील, शिवाजी हावळाण्णाचे, अभिजित मजुकर, अशोक घगवे, नारायण मुंचडीकर, भागोजीराव पाटील, निपाणी युवा समिती अध्यक्ष लक्ष्मीकांत पाटील, सुनिल किरळे, रंजित हावळाण्णाचे, मोतेश बारदेशकर, सचिन दळवी, गजानन शहापूरकर, सुरज कणबरकर, प्रविण गौडर, सुरज जाधव, गणेश मोहिते, निलेश काकतकर, श्रीकांत नादूंरकर, राजू नागेश पावले, दिपक लोहार, अनिल देसूरकर, शुभम जाधव, विनायक कांगले, दिपक गुळेनव्वर, अमोल चौगुले, रोहित वायचळ, विशाल सावंत, अभिषेक कारेकर, किरण नार्वेकर, आनंद तुप्पट, अभिषेक तुप्पट, अक्षय पाटील, नागेश सरफ, सुरज जाधव, ज्ञानेश्वर चिकोर्डे, तब्रेज मस्केवाले, राहूल देसूरकर, पवन खाडे, शेखर कोडेकर, चेतन अजरेकर, दिगंबर खांबले, बसवंत गावडोजी, अनिल घडशी, प्रशांत बैलूरकर, प्रविण पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
💬 महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचा संदेश स्पष्ट – मराठी भाषिकांवर अन्याय खपवून घेतला जाणार नाही!