बेळगाव : होसुर शहापूर परिसरात प्रसाद चंद्रकांत जाधव या तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला करण्यात आला. पाच हजार रुपयांच्या देवाणघेवाणीतून हा हल्ला झाल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे.
हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या प्रसाद जाधव याला तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेनंतर शहापूर पोलिसांनी तत्काळ हालचाल करत हल्ला करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे.
या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून शहापूर पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.
