बेळगाव (प्रतिनिधी): समर्थ नगर परिसरात आज सकाळी एका महिलेने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ८ ऑक्टोबर रोजी सकाळी अंदाजे ५.३० वाजता संबंधित महिला घराबाहेर पडली होती. काही वेळानंतर विहिरीजवळ चपला दिसल्याने स्थानिकांना संशय आला आणि त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली.
सकाळी सुमारे १०.३० वाजता Herf Rescue Team चे सदस्य घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तत्परतेने बचावकार्य हाती घेत मृतदेह बाहेर काढला. या मोहिमेत बसवराज, राजू, पद्मप्रसाद हूळी यांनी सक्रिय सहभाग घेतला. तसेच समाजसेवक अवधूत तुडवेकऱ्यांनीही या बचावकार्याला मदत केली.
महिलेची ओळख पटली असून, तिच्याबाबतची सविस्तर माहिती अद्याप अधिकृतरीत्या समोर आलेली नाही. घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
