गणेशपूर येथे विहिरीत आढळला महिलेचा मृतदेह; H.E.R.F रेस्क्यू टीमची तात्काळ कारवाई

गणेशपूर येथे विहिरीत आढळला महिलेचा मृतदेह; H.E.R.F रेस्क्यू टीमची तात्काळ कारवाई

बेळगाव
गणेशपूर येथील पाटील गल्ली परिसरात आज सकाळी एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली. अलक्का बसवंत पाटील (वय ५२ वर्षे), रा. पाटील गल्ली, गणेशपूर यांचा मृतदेह एका विहिरीत आढळून आल्याची माहिती कॅम्प पोलीस स्टेशनला मिळाली.

माहिती मिळताच कॅम्प पोलीस स्टेशनमार्फत आज सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास H.E.R.F – Helpline Emergency Rescue Foundation च्या रेस्क्यू टीमला तातडीचा कॉल करण्यात आला. कोणताही विलंब न करता H.E.R.F ची रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली.

टीमचे प्रमुख बसवराज हिरेमठ आणि अभिषेक येळूरकर यांच्या नेतृत्वाखाली, कॅम्प पोलीस स्टेशनमधील अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने अत्यंत संयमाने व सुरक्षित पद्धतीने रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आले. अवघ्या १५ ते २० मिनिटांत विहिरीतून मृतदेह बाहेर काढून तो पोलीस प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आला.

यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला असून, या घटनेचा पुढील तपास कॅम्प पोलीस स्टेशनकडून सुरू आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

eighteen − 3 =

error: Content is protected !!