बेळगाव, दि. १९ (प्रतिनिधी) : शिवजन्मोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पालखी मिरवणुकीला यंदा सामाजिक समतेचा अनोखा संदेश देण्यात आला. मनवाडकर परिवाराच्या पुढाकाराने नियमित शिवछत्रपतींची पालखी विधवा माऊलींच्या खांद्यावर देऊन मिरवणूक सोहळ्याची सुरुवात करण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्व भेदभाव ३५० वर्षांपूर्वीच संपवून सामाजिक समतेचा आदर्श दिला होता. त्याच विचारांना अनुसरून विधवा महिलांना प्रत्येक कार्यक्रमात सन्मानाने सहभागी करून घेणे आवश्यक असल्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
पालखी सोहळ्यादरम्यान उपस्थितांनी या उपक्रमाचे स्वागत करत मनवाडकर परिवाराचे कौतुक केले. विधवा महिलांनीही अभिमानाने पालखी उचलत शिवजन्मोत्सव साजरा केला. सामाजिक समता, सन्मान आणि एकात्मतेचा संदेश देणारा हा सोहळा उत्साहात पार पडला.
#Belgav #BedhadakBelgav
