व्हिवा स्केट्स तर्फे उदयोन्मुख खेळाडूंना स्केटिंग किटचे वाटप

व्हिवा स्केट्स तर्फे उदयोन्मुख खेळाडूंना स्केटिंग किटचे वाटप

बेळगांव :बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशन तर्फे गोवावेस येथील चंपाबाई भोगले शाळा व वस्तीगृहातील १३ मुलींना मोफत स्केटिंग प्रशिक्षण देण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाला प्रोत्साहन देत विवा स्केट्स कंपनीने सर्व मुलींना स्केटिंग किट मोफत प्रदान केले.

यावेळी कंपनीचे सीईओ विराग वैष्णव यांनी या उदयोन्मुख खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन दिले. तसेच श्री कामकर बंधू यांच्या मार्फत सर्व खेळाडूंना टी-शर्टचेही वाटप करण्यात आले.

या सर्व मुलींना गोवावेस येथील स्केटिंग रिंकवर संघटनेच्या वतीने नियमित व मोफत प्रशिक्षण दिले जात आहे. प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, विशाल वेसने, सोहम हिंडलगेकर, योगेश कुलकर्णी आणि विठ्ठल गंगणे यांच्या मार्गदर्शनाखाली या मुली सराव करत आहेत. शाळेचे अध्यक्ष, मुख्याध्यापक, शारीरिक शिक्षक तसेच स्थानिक नागरिकांचेही त्यांना मोलाचे प्रोत्साहन लाभत आहे.

या उपक्रमामुळे ग्रामीण व अल्पसुविधा असलेल्या विद्यार्थिनींना क्रीडा क्षेत्रात आपली ओळख निर्माण करण्याची मोठी संधी उपलब्ध झाली असून, भविष्यात या मुली राज्य व राष्ट्रीय स्तरावर चमकतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

eighteen − 16 =

error: Content is protected !!