विद्याभारती जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धा, संत मीरा,भातकांडे,शांतीनिकेतन,स्वामी विवेकानंद उपांत्य फेरीत.

विद्याभारती जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धा, संत मीरा,भातकांडे,शांतीनिकेतन,स्वामी विवेकानंद उपांत्य फेरीत.

बेळगाव तारीख ,4. गणेशपुररोड येथील गुड शेफर्ड शाळेचे आवारातील बेळगाव टर्फ मैदानावर संत मीरा इंग्रजी माध्यम शाळा गणेशपुर हे हिंडलगा आयोजित विद्याभारती जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत शुक्रवारी खेळविण्यात आलेल्या विविध सामन्यात संत मीरा अनगोळ, गजाननराव भातकांडे,शांतीनिकेतन स्कूल खानापूर,स्वामी विवेकानंद स्कूल खानापूर यांनी प्रतिस्पर्ध्यांचा पराभव उपांत्य फेरीत प्रवेश केला
सकाळी स्पर्धेच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे माजी उपमहापौर आनंद चव्हाण विमल स्पोर्टस फाऊंडेशनचे अध्यक्ष किरण जाधव, जनकल्याण ट्रस्टचे सचिव सुधीर गाडगीळ ट्रस्टी लक्ष्मण पवार अशोक शिंत्रे , संत मीरा संत मीरा गणेशपुर शाळेचे अध्यक्ष डॉ विजय गोवेकर सचिव देवीप्रसाद कुलकर्णी मुख्याध्यापिका आरती पाटील विद्याभारती जिल्हा उपाध्यक्ष रामनाथ नाईक, विनायक ग्रामोउपाध्ये ,विद्याभारती जिल्हा शारीरिक प्रमुख चंद्रकांत पाटील, श्वेता पाटील आशा भुजबळ श्रीकांत कांबळे, या मान्यवरांच्या उपस्थितीत ओंकार सरस्वती भारतमाता फोटो पूजन व दीप प्रज्वलन करूनतसेच पाहुण्यांच्या हस्ते खेळाडूंची ओळख व फुटबॉल चेंडूला किक मारून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी किरण जाधव आनंद चव्हाण अशोक शिंत्रे यांनी खेळाडूंना मार्गदर्शनपर भाषणे केली.
याप्रसंगी शिवकुमार सुतार, यश पाटील पंच मानस नायक आदित्य सानी ,सोहम ताशिलदार,प्रणव देसाई ओमकार गावडे, हर्ष रेडेकर, आदी उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

1 × two =

error: Content is protected !!