महिला दिनानिमित्त वेर्णेकर हॉस्पिटलचा उपक्रम; १५० ज्येष्ठ नागरिकांची अल्ट्रासाउंड तपासणी

महिला दिनानिमित्त वेर्णेकर हॉस्पिटलचा उपक्रम; १५० ज्येष्ठ नागरिकांची अल्ट्रासाउंड तपासणी

बेळगाव : वडगाव येथील आदर्श नगरमधील वेर्णेकर हॉस्पिटल तर्फे आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधत सोमवार (दि. ९ मार्च) रोजी विशेष आरोग्य उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत साठ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी अल्ट्रासाउंड तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. परिसरातील नागरिकांनी या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद देत १५० हून अधिक जणांनी तपासणीचा लाभ घेतला.

कार्यक्रमादरम्यान डॉ. उमेश वेर्णेकर यांनी मार्गदर्शन करताना आजच्या काळात शिक्षण, क्रीडा, उद्योग, प्रशासन आदी विविध क्षेत्रांमध्ये महिलांची प्रगती लक्षणीयरीत्या वाढत असल्याचे सांगितले. समाजाच्या सर्वांगीण विकासात महिलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचेही त्यांनी नमूद केले.

या कार्यक्रमात डॉ. उमेश वेर्णेकर, डॉ. निखिल वेर्णेकर, डॉ. सौम्या वेर्णेकर आणि डॉ. निकिता वेर्णेकर यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. सौम्या वेर्णेकर यांनी उपस्थित नागरिकांचे आभार मानले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

12 − ten =

error: Content is protected !!