बेळगाव :
शहरातील दोन महिलांनी भटक्या कुत्र्यांना कच्चे मांस खाऊ घातल्याचा प्रकार उघडकीस आला असून या दोघी महिलांविरुद्ध कॅम्प पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकारामुळे परिसरातील कुत्र्यांचे आक्रमक वर्तन वाढल्याची स्थानिकांची तक्रार आहे.
नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, कच्चे मांस खाऊ घालण्यामुळे भटक्या कुत्र्यांचा स्वभाव आक्रमक बनत असून विशेषतः निवासी भाग आणि शाळांच्या परिसरात हल्ल्याचा धोका वाढला आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अधिकाऱ्यांनी नागरिकांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची आठवण करून दिली असून सार्वजनिक ठिकाणी भटक्या कुत्र्यांना खाऊ घालणे कायद्याने बंदीघातलेले आहे. अशा प्राण्यांना खुराक देताना केवळ खासगी किंवा नियुक्त ठिकाणीच देण्याचे आवाहन करण्यात आले आहे, जेणेकरून सार्वजनिक स्वच्छता आणि सुरक्षितता राखली जाईल.
पोलीस आणि प्रशासनाने नागरिकांना सहकार्य करण्याचे आणि शहरात शांतता व सुरक्षिततेचे वातावरण राखण्यासाठी नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
📞 तक्रारींसाठी संपर्क:
0831-2405337 / 112
#Belgav #BedhadakBelgav
