शांकभरी पौर्णिमेनिमित्त शिवाजीनगर येथे ५ जानेवारीला पारंपरिक नौगोबा यात्रा; भाविकांना उपस्थितीचे आवाहन

शांकभरी पौर्णिमेनिमित्त शिवाजीनगर येथे ५ जानेवारीला पारंपरिक नौगोबा यात्रा; भाविकांना उपस्थितीचे आवाहन

बातमी:
बेळगाव : दरवर्षीप्रमाणे शांकभरी पौर्णिमेच्या निमित्ताने रेणुका देवी व सासनकाठीची पारंपरिक नौगोबा यात्रा सोमवार, दिनांक ५ जानेवारी २०२६ रोजी शिवाजीनगर पेट्रोल पंपासमोरील जागेत भक्तिभावात संपन्न होणार आहे.

बेळगाव शहर व परिसरातील असंख्य भाविक श्रीक्षेत्र सौंदत्ती येथील यल्लमा डोंगरावर दर्शनासाठी जातात. दर्शनानंतर परत येताना शिवाजीनगर येथे थांबून रेणुका देवीची परडी भरण्याचा विधी करूनच घरी परतण्याची परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे. या परंपरेनुसार सदर ठिकाणीच नागोबा यात्रा भरवली जाते. बेळगाव शहरात इतर कोणत्याही ठिकाणी ही यात्रा आयोजित केली जात नाही.

ही यात्रा बेळगाव शहर देवस्थान मंडळ व पंच कमिटीच्या निर्णयानुसार आयोजित करण्यात येत असून, सर्व भाविकांनी, आजी-माजी आमदार, नगरसेवक तसेच विविध गल्लीतील पंचमंडळी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ही यात्रा मोठ्या उत्साहात साजरी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

हे आवाहन बेळगाव शहर देवस्थान कमिटीचे अध्यक्ष रणजीत चव्हाण पाटील व सेक्रेटरी परशराम माळी यांनी केले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

nine + 20 =

error: Content is protected !!