आदर्श नगर सहावा क्रॉस येथे हजारो लिटर पाणी वाया; तक्रारीनंतरही महापालिकेचे दुर्लक्ष

आदर्श नगर सहावा क्रॉस येथे हजारो लिटर पाणी वाया; तक्रारीनंतरही महापालिकेचे दुर्लक्ष

बेळगाव : शहरातील आदर्श नगर सहावा क्रॉस येथे काल दि. 13 फेब्रुवारी दुपारपासून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती सुरू असून आतापर्यंत हजारो लिटर पाणी वाया गेले आहे. परिसरात तब्बल तीन ते चार ठिकाणी मुख्य पाईपलाईन फुटल्याने रस्त्यावर पाण्याचे ओहोळ वाहत आहेत.

स्थानिक नागरिकांनी तात्काळ महापालिकेकडे तक्रार नोंदवूनही अद्याप कोणताही कर्मचारी किंवा अधिकारी घटनास्थळी पोहोचलेला नाही, अशी माहिती रहिवाशांनी दिली. विशेष म्हणजे, गेल्या आठवड्यात ज्या ठिकाणी गळतीबाबत बातमी प्रसिद्ध झाली होती, त्याच परिसराच्या काही अंतरावर ही नवी गळती सुरू झाली आहे.

एकीकडे पाणीटंचाईचा सामना करावा लागत असताना हजारो लिटर पाणी वाया जात असल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. संबंधित विभागाने तातडीने दुरुस्ती करून पाणी वाया जाणे थांबवावे, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

#Belgav #BedhadakBelgav

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

5 + eighteen =

error: Content is protected !!