चिंचली स्थानकात ८ रेल्वेगाड्यांना तात्पुरता थांबा

चिंचली स्थानकात ८ रेल्वेगाड्यांना तात्पुरता थांबा

बेळगाव : रायबाग तालुक्यातील प्रसिद्ध मायक्का देवी यात्रेच्या पार्श्वभूमीवर दक्षिण पश्चिम रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. यात्रेदरम्यान भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन चिंचली रेल्वे स्थानकात ८ रेल्वेगाड्यांना तात्पुरता थांबा देण्यात येणार आहे. हा निर्णय १ फेब्रुवारी ते १२ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत अंमलात राहणार आहे.

या काळात दादर–तिरुनेलवेली, तिरुनेलवेली–दादर, दादर–पुद्दुचेरी, पुद्दुचेरी–दादर, दादर–म्हैसूर, म्हैसूर–दादर या त्रैसाप्ताहिक व साप्ताहिक एक्सप्रेस गाड्यांसह तिरुपती–कोल्हापूर व कोल्हापूर–तिरुपती या दैनिक एक्सप्रेस गाड्यांना चिंचली स्थानकात थांबा दिला जाणार आहे.

बहुतेक गाड्या सकाळी ७.०८ ते ७.०९, सायंकाळी १८.२९ ते १८.३०, तर दुपारी १३.०६ ते १३.०७ आणि १३.५७ ते १३.५८ या वेळेत चिंचली स्थानकात थांबणार आहेत. हा थांबा केवळ नामनिर्देशित दिवशीच लागू राहील, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

या निर्णयामुळे मायक्का देवी यात्रेसाठी येणाऱ्या हजारो भाविकांना मोठा दिलासा मिळणार असून, प्रवास अधिक सुलभ होणार आहे. दक्षिण पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. मंजुनाथ कानमडी यांनी ही माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

six + 15 =

error: Content is protected !!