बेळगाव : सिव्हिल हॉस्पिटल येथील डिलिव्हरी महिला वॉर्डमध्ये थंडीपासून संरक्षण मिळावे या उद्देशाने स्वेटर व ऊबदार कानटोपींचे वितरण करण्यात आले. हा सामाजिक उपक्रम जॉईंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेन यांच्या तर्फे अध्यक्ष लक्ष्मण शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आला.
कार्यक्रमास वैद्यकीय अधीक्षक डॉ. इराण्ण पल्लेद तसेच रिजनल मेडिकल ऑफिसर डॉ. उदपुडी मॅडम यांची उपस्थिती लाभली. डिलिव्हरी झालेल्या महिलांसाठी उत्कृष्ट दर्जाचे स्वेटर व ऊबदार कानटोपी देण्यात आल्याने लाभार्थींनी समाधान व्यक्त केले.

या उपक्रमासाठी ग्रुपच्या सदस्यांची उपस्थिती उल्लेखनीय होती. यावेळी आकाश लाटुकर, प्रशांत मेलगे, राहुल बेलवलकर, फेडरेशन ऑफिसर सुनील मुलगेकर, संजय पाटील, अरुण काळे, उमेश पाटील, विजय बन्सूर, आनंद कुळकर्णी, अविनाश पाटील, वाय. एन. पाटील, सचिन विश्वास पवार, प्रकाश तांजी, अशोक हलगेकर, रिपोर्टर संजय सूर्यवंशी, मोहन पत्तार आदी मान्यवर उपस्थित होते.
