गौंडवाड : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित महात्मा गांधी हायस्कूल, गौंडवाड येथे दहावीच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मार्गदर्शनासाठी आयोजित करण्यात आलेल्या एस.एस.एल.सी. व्याख्यानमालेचा शुभारंभ उत्साहात पार पडला. माजी ग्रामपंचायत उपाध्यक्ष व विद्यमान सदस्य यल्लोजीराव पाटील यांच्या पुढाकारातून सलग चौथ्या वर्षी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षणप्रेमी श्री. एन. वाय. पिंगट होते. कार्यक्रमाची सुरुवात दहावीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या स्वागत गीताने झाली. प्रभारी मुख्याध्यापक श्री. जी. एस. धामणेकर यांनी प्रास्ताविकातून व्याख्यानमालेचे महत्त्व स्पष्ट करत विद्यार्थ्यांनी या संधीचा पुरेपूर लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
सूत्रसंचालनाची जबाबदारी श्री. एस. एस. लाड यांनी प्रभावीपणे पार पाडली, तर आभार प्रदर्शन श्री. एस. वाय. आंबोळकर यांनी केले. उद्घाटनप्रसंगी यल्लोजीराव पाटील यांच्यासह श्री. अमोल पाटील व श्री. प्रशांत पवार उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना परीक्षाभिमुख मार्गदर्शन मिळावे, आत्मविश्वास वाढावा आणि यशाची दिशा स्पष्ट व्हावी या उद्देशाने या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले असून, या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले.
यावेळी शाळेतील शिक्षकवृंद — जे. पी. अगसीमनी, पी. एच. पाटील, यु. बी. बामणे, पी. एम. जाधव, पी. पी. पाटील, पी. आर. पाटील आदी उपस्थित होते.
