बेळगाव : शहापूर येथील नाथ पै चौकातील पुरातन श्री काळभैरवनाथ मंदिरात सोमवार दि. ११ नोव्हेंबर व मंगळवार दि. १२ नोव्हेंबर रोजी श्री काळभैरवनाथ जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमांतर्गत मंगळवार दि. ११ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता होम विधी पार पडणार असून, बुधवार दि. १२ नोव्हेंबर रोजी सकाळी अभिषेक, श्री काळभैरव जन्मोत्सव, महाआरती, महापूजा व प्रसाद वाटपाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी पाच वाजता दीपोत्सव व भजन कार्यक्रमाने उत्सवाची सांगता होणार आहे.
या निमित्ताने मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून अनेक भाविकांनी जयंती उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन मंदिर ट्रस्ट कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे. ज्या भाविकांना अभिषेक करावयाचा आहे त्यांनी मंदिराचे पुजारी (मो. ९९०१६५५४५०) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
