बेळगाव (प्रतिनिधी) : बेळगाव तालुक्यातील आंबेवाडी गावचे रहिवासी असलेले भारतीय सेनेतील जवान मयूर लक्ष्मण धूपे यांचे कॉम्बॅट ट्रेनिंगदरम्यान झालेल्या अपघातात दुःखद निधन झाले. देशसेवेच्या कर्तव्यावर असताना घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
शहीद जवान मयूर लक्ष्मण धूपे यांचे पार्थिव उद्या सकाळी बेळगाव येथे आणण्यात येणार असून, मिलिटरी हॉस्पिटल बेळगाव येथून ते आंबेवाडी येथील त्यांच्या मूळ गावी नेण्यात येईल. आंबेवाडी येथे सर्व शासकीय सन्मानांसह, एक्स-सर्व्हिसमेन ऑर्गनायझेशन तसेच संबंधित संघटनांच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या या वीर जवानाला अखेरची श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे व शहीद जवानाच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
अंत्यसंस्काराचा तपशील:
वेळ: सकाळी ९.३० वाजता
स्थळ: आंबेवाडी (मूळ गाव)
सदर माहिती श्री. शिवबसप्पा कडन्नावर जनरल सेक्रेटरी, बेळगाव जिल्हा महाकठ एक्स-सर्व्हिसमेन ऑर्गनायझेशन, बेळगाव यांनी कळविले आहे.
