अनगोळ येथे श्री विश्वकर्मा जयंतीनिमित्त शरीरसौष्ठव स्पर्धा उत्साहात,संकेत सुरुतेकर ठरला ‘श्री विश्वकर्मा २०२६’

अनगोळ येथे श्री विश्वकर्मा जयंतीनिमित्त शरीरसौष्ठव स्पर्धा उत्साहात,संकेत सुरुतेकर ठरला ‘श्री विश्वकर्मा २०२६’

बेळगाव : श्री विश्वकर्मा जयंतीनिमित्त अनगोळ येथे आयोजित करण्यात आलेल्या अनगोळ मर्यादित टॉप–१० शरीरसौष्ठव स्पर्धा २०२६ मोठ्या उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत संकेत सुरुतेकर याने उत्कृष्ट कामगिरी करत ‘श्री विश्वकर्मा २०२६’ या किताबाचा मानकरी होण्याचा बहुमान पटकावला. तर बेस्ट पोझर हा किताब श्रीहरी बेळगावकर याने जिंकला.

या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून दिपक सोमनाचे, वनिता सुतार, पिंटू C.K., राज S.K., सागर लोहार, सचिन लोहार, रमेश लोहार, सचिन मंडोळकर, अनिल सुतार, सिद्धलिंगय्या अक्की व अथीत बेलेकर उपस्थित होते.

स्पर्धेचे परीक्षण पंच म्हणून राजेश लोहार, अनिल अंबरोळे, रणजित किल्लेकर, सुनील चौधरी, भारत बाळेकुंद्री, सुनील बोकडे, संतोष सुतार व नारायण चौगुले यांनी केले. तर संपूर्ण स्पर्धेचे स्टेज मार्शल म्हणून विनोद मेत्री यांनी जबाबदारी सांभाळली.

स्पर्धकांनी सादर केलेल्या दमदार शरीरसौष्ठव कौशल्यामुळे उपस्थित प्रेक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. आयोजकांनी या यशस्वी आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

six + nine =

error: Content is protected !!