मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाच्या अध्यक्ष निवड प्रक्रियेवरून शुभम शेळके यांचा उपाध्यक्ष पदाचा राजीनामा.

मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाच्या अध्यक्ष निवड प्रक्रियेवरून शुभम शेळके यांचा उपाध्यक्ष पदाचा राजीनामा.

बेळगाव : मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळात अंतर्गत वाद उफाळून आला असून मंडळाचे उपाध्यक्ष शुभम शेळके यांनी आपल्या पदाचा राजीनामा सादर केला आहे. त्यांनी दिलेल्या पत्रात निवड प्रक्रियेबाबत गंभीर आक्षेप नोंदवत हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे

दि. ५ एप्रिल २०२६ रोजी झालेल्या घडामोडींमध्ये अचानकपणे विषय मांडून अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आल्याचा आरोप शेळके यांनी केला आहे. संबंधित विषयाचा योग्य आढावा न घेता व सर्वांना विश्वासात न घेता निर्णय घेतल्याने ही प्रक्रिया पारदर्शक नसल्याचे त्यांनी नमूद केले.

गेल्या ४० वर्षांपासून मंडळात कार्यरत असलेल्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा विचार न करता काही मंडळींनी लोकशाही पद्धतीला डावलत ही निवड केल्याचा आरोप त्यांनी पत्रातून व्यक्त केला आहे. यामुळे नाराजी व्यक्त करत त्यांनी उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असून तो मंजूर करण्याची विनंती मंडळाकडे केली आहे.

दरम्यान, या राजीनाम्यामुळे मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळातील वाद अधिक चिघळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

seventeen − sixteen =

error: Content is protected !!