बेळगाव : मूळचे तानाजी गल्ली येथील व सध्या पंचवटी कॉलनी, शिवतीर्थ अपार्टमेंटच्या मागील बाजूस, महांतेश नगर येथे वास्तव्यास असलेले श्री. विक्रांत परशराम शेळके (वय 59) यांचे मंगळवारी रात्री सुमारे साडेआठ वाजण्याच्या दरम्यान अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
ते महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष व युवा नेते शुभम शेळके यांचे वडील होत. विक्रांत शेळके हे बर्डे रोडलाईन्स येथे व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या अकाली निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक चिरंजीव व एक कन्या असा परिवार आहे.
अंत्यविधी बुधवारी सकाळी ९ वाजता सदाशिवनगर स्मशानभूमीत होणार आहे. तसेच रक्षा विसर्जन गुरुवारी सकाळी ८ वाजता करण्यात येणार आहे.
