बेळगाव : पांगुळ गल्ली येथील श्री अश्वत्थामा युवक मंडळातर्फे होळी व रंगपंचमी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंडळाच्या वतीने नागरिकांसाठी विशेष सूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.
यंदा सोमवार दिनांक २ मार्च २०२६ रोजी रात्री ठीक १० वाजता होळी आणण्याचा व पळवण्याचा पारंपरिक कार्यक्रम पार पडणार आहे. त्यानंतर मंगळवार दिनांक ३ मार्च २०२६ रोजी पहाटे ५.३० वाजता होळी व होळी धनाची विधीवत पूजा करण्यात येणार आहे.
दरम्यान, यंदा चंद्रग्रहण असल्यामुळे इतर कार्यक्रमांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. लोटांगणाचा कार्यक्रम सायंकाळी ५ वाजता गणपती मंदिर येथून सुरू होईल. देवालयातील पूजा ग्रहण सुटल्यानंतर करण्यात येणार असून त्यानंतर श्रीफळ वाडवण्याचा कार्यक्रम होणार आहे.
सर्व भक्तांनी तसेच बेळगावातील नागरिकांनी या कार्यक्रमांची नोंद घ्यावी आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पंच कमिटी व कार्यकारी मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
#Belgav #BedhadakBelgav
