संध्याकिरण सेवा केंद्रात ज्ञान व मनोरंजनाचा कार्यक्रम उत्साहात पार
बेळगाव – बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या संध्याकिरण सेवा केंद्रामार्फत ज्ञान व मनोरंजनाचा कार्यक्रम डॉ. निता देशपांडे डायबेटिस सेंटर, सोमवारपेठ टिळकवाडी येथे उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्वास धुराजी होते. व्यासपीठावर उपाध्यक्ष के. एल. मजूकर, कार्यवाह सुरेंद्र देसाई व सहकार्यवाह शिवराज पाटील उपस्थित होते. प्रारंभी माजी अध्यक्ष डी. पी. शिंदे व वीरव्वा हलगी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी विश्वास धुराजी यांनी कै. शिंदे यांच्या कार्याचा गौरव करून त्यांच्या योगदानाची माहिती दिली.
कार्यक्रमात औदुंबर शेट्ये यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. त्यानंतर रविंद्रनाथ व स्नेहलता जुवळी, सुरेंद्र व योगिनी देसाई, सदाशिव व गिरिजा कुलकर्णी, प्रकाश कुडतरकर, औदुंबर शेट्ये, जगमोहन अगरवाल, विजय वाईगडे, रविंद्र कुंभोजकर, शोभा हत्तरकी, नारायण कोरडे, मिलिंद हुद्दार, बाळकृष्ण बिर्जे, सुरेश खानोलकर, प्रभाकर देसाई व अरविंद मुतकेकर यांनी मराठी, हिंदी आणि कन्नड गाणी तसेच अभंग सादर करून उपस्थितांचे मनोरंजन केले.
शिवराज पाटील यांनी स्वागत केले तर के. एल. मजूकर यांनी आभार मानले.
#Belgav #BedhadakBelgav
