बेळगाव : बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या ‘संध्या किरण सेवा केंद्रा’ तर्फे आयोजित ज्ञान आणि मनोरंजनाचा कार्यक्रम डॉ. निता देशपांडे डायबेटिस सेंटर, सोमवारपेठ टिळकवाडी येथे उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अशोक कदम उपस्थित होते. व्यासपीठावर अध्यक्ष विश्वास धुराजी, कार्यवाह सुरेंद्र देसाई, उपाध्यक्ष के. एल. मजूकर आणि सहकार्यवाह शिवराज पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सेक्रेटरी सुरेंद्र देसाई यांनी केले. प्रमुख पाहुणे अशोक कदम यांनी उत्तर भारतातील नद्यांविषयी माहिती देत त्यांचे सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व स्पष्ट केले. अध्यक्ष विश्वास धुराजी यांनी आपल्या चारधाम यात्रेचा प्रेरणादायी अनुभव कथन केला.
कार्यक्रमात मनोरंजनाचा सुरेल रंगही चढला. रविंद्रनाथ जुवळी, योगिनी देसाई, सदाशिव आणि गिरिजा कुलकर्णी, जगमोहन आगरवाल, नारायण कोरडे, प्रकाश कुडतरकर, विजयमाला पाटील आणि अश्विनी पाटील यांनी मराठी व हिंदी गाण्यांची मनमोहक सादरीकरणे केली.
कार्यक्रमाचे स्वागत सुरेंद्र देसाई यांनी केले तर आभारप्रदर्शन शिवराज पाटील यांनी मानले.
या ज्ञानवर्धक आणि आनंददायी कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
