सार्वजनिक वाचनालय आयोजित संगीत भजन स्पर्धेचा आज समारोप

सार्वजनिक वाचनालय आयोजित संगीत भजन स्पर्धेचा आज समारोप

सार्वजनिक वाचनालय आयोजित संगीत भजन स्पर्धेचा आज समारोप

प्रा. पी. डी. पाटील यांचे मार्गदर्शन

बेळगाव : सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने मराठा मंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या नवव्या संगीत भजन स्पर्धेचा समारोप मंगळवार दि. १९ ऑगस्ट रोजी होत आहे. या भजन स्पर्धेत बेळगाव शहर, बेळगाव तालुका, खानापूर व चंदगड तालुक्यातील एकूण ३१ भजनी मंडळांनी सहभाग नोंदवला आहे. सोमवारी सायंकाळपर्यंत २५ मंडळांनी आपली कला सादर केली असून मंगळवारी अंतिम फेरी रंगणार आहे.

अंतिम फेरी व समारोप समारंभ

मंगळवारी दुपारी दोन वाजता स्पर्धांना प्रारंभ होणार असून निडडल, गोल्याळी, कल्लेहोळ, माणगाव, जांबोटी व कुद्रेमानी येथील सहा पुरुष भजनी मंडळे अंतिम फेरीत सहभाग घेणार आहेत. त्यानंतर आयोजित विशेष कार्यक्रमात प्रा. पी. डी. पाटील हे “संत साहित्य व समाज प्रबोधन” या विषयावर व्याख्यान देतील.

या समारोप समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून मराठा मंदिरचे अध्यक्ष आप्पासाहेब गुरव उपस्थित राहणार असून अध्यक्षस्थानी सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष अनंत लाड असतील.

आकर्षक बक्षिसे व गौरव

महिला व पुरुष अशा दोन्ही गटातील विजेत्या भजनी मंडळांना पंधरा हजार ते अडीच हजार रुपयांपर्यंत अशी नऊ व उत्तेजनार्थ एक असे एकूण दहा बक्षिसे देण्यात येणार आहेत. तसेच उत्कृष्ट मृदंग, तबला, पेटी वादक व गायक यांना प्रत्येकी १५०० रुपये रोख बक्षीस दिले जाणार आहे. सर्वांसाठी खुला प्रवेश असलेल्या या स्पर्धांचा लाभ घ्यावा, असे आवाहन वाचनालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रा. पी. डी. पाटील यांचा परिचय

महात्मा फुले ज्युनिअर कॉलेज, महागाव येथे राज्यशास्त्राचे प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले प्रा. पी. डी. पाटील हे कोल्हापूर जिल्हा दारूबंदी कृती समितीचे समन्वयक, अंधश्रद्धा निर्मूलन समिती गडहिंग्लज तालुक्याचे कार्याध्यक्ष आहेत. ‘लेक वाचवा’ अभियानात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला असून त्यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारासह अनेक सन्मान प्राप्त झाले आहेत. शेकडो व्याख्याने देऊन समाजप्रबोधन करणारे एक उत्कृष्ट वक्ते म्हणून ते परिचित आहेत.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

1 × 3 =

error: Content is protected !!