सार्वजनिक वाचनालयाच्या संगीत भजन स्पर्धा संपन्नमहिला गटात मुक्त ग्रुप, पुरुष गटात रवळनाथ भजनी मंडळ अव्वल

सार्वजनिक वाचनालयाच्या संगीत भजन स्पर्धा संपन्नमहिला गटात मुक्त ग्रुप, पुरुष गटात रवळनाथ भजनी मंडळ अव्वल

सार्वजनिक वाचनालयाच्या संगीत भजन स्पर्धा संपन्न
महिला गटात मुक्त ग्रुप, पुरुष गटात रवळनाथ भजनी मंडळ अव्वल

बेळगाव – सार्वजनिक वाचनालय, बेळगाव यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नवव्या संगीत भजन स्पर्धा १७ ते १९ ऑगस्टदरम्यान मराठा मंदिर येथे उत्साहात पार पडल्या. एकूण ३१ गटांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्यामध्ये महिला गटातील १९ आणि पुरुष गटातील १२ गटांनी भजनी स्पर्धेत भाग घेतला.

महिला गटात मुक्त ग्रुप महिला भजनी मंडळ, टिळकवाडी तर पुरुष गटात रवळनाथ भजनी मंडळ, अडकूर (ता. चंदगड) यांनी प्रथम क्रमांक पटकावला. विजेत्या गटांना प्रत्येकी १५ हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

मंगळवारी सायंकाळी झालेल्या बक्षीस वितरण समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून मराठा मंदिराचे अध्यक्ष आप्पासाहेब गुरव उपस्थित होते. प्रमुख वक्ते म्हणून महागाव कॉलेज, गडहिंग्लज येथील प्रा. पी. डी. पाटील यांनी उपस्थितांना “संत साहित्य व समाज प्रबोधन” या विषयावर मार्गदर्शन करताना संत तुकोबा महाराज, संत गाडगेबाबा, संत बसवेश्वर, ज्ञानेश्वर माऊली यांचे विचार मांडले. “विठुरायाच्या हातात कोणतेही शस्त्र नसून तो भक्तीचे प्रतीक आहे. आंधळेपणाने विश्वास न ठेवता सत्याची पडताळणी करणे गरजेचे आहे” असा संदेश त्यांनी दिला.

या वेळी अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष अनंत लाड होते. व्यासपीठावर उपाध्यक्ष डॉ. विनोद गायकवाड, कार्यवाह सुनिता मोहिते, संचालक अभय याळगी, लता पाटील, रघुनाथ बांडगी, प्रसन्न हेरेकर व नेताजी जाधव उपस्थित होते.

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आला :

  • महिला गट – (१) मुक्त ग्रुप महिला भजनी मंडळ, टिळकवाडी (२) सद्गुरु भजनी मंडळ, भाग्यनगर (३) ओमकार महिला भजनी मंडळ, हनुमान नगर (४) जय हरी महिला भजनी मंडळ, राजहंसगड (५) श्री मंगाई महिला भजनी मंडळ, वडगाव (६) भक्ती सांस्कृतिक महिला भजनी मंडळ, बापट गल्ली (७) संत मुक्ताई महिला भजनी मंडळ, भारतनगर (८) ज्ञानेश्वर महिला भजनी मंडळ, राजवाडा कंपाऊंड वडगाव (९) स्वामी समर्थ महिला भजनी मंडळ, किणये. तसेच पंचराशी महिला भजनी मंडळ, राकसकोप यांना उत्तेजनार्थ पारितोषिक.
  • पुरुष गट – (१) श्री रवळनाथ भजनी मंडळ, अडकूर (२) श्रीहरी संगीत कला मंच, कलेहोळ (३) रवळनाथ भजनी मंडळ, गोल्याळी (ता. खानापूर) (४) जय हनुमान कलाप्रेमी भजनी मंडळ, करंजगाव (५) श्री संत तुकाराम भजनी मंडळ, माणगाव (ता. चंदगड) (६) श्री मरगुबाई भजनी मंडळ, माणगाव (ता. चंदगड) (७) श्री धन्य ते माता पिता भजनी मंडळ, बाकणूर (८) श्री विठ्ठल रखुमाई भजनी मंडळ, कुद्रेमानी (९) श्रीहरी भजनी मंडळ, इनाम बडस (१०) श्री सिद्धेश्वर संगीत भजनी मंडळ, निडगल (ता. खानापूर).

वैयक्तिक पारितोषिके :
उत्कृष्ट तबला वादक – श्रीहरी संगीत कला मंच, कलेहोळ;
मृदंग वादक – जय हरी महिला भजनी मंडळ, राजहंसगड;
पेटीवादक – भक्ती सांस्कृतिक महिला भजनी मंडळ, बापट गल्ली, बेळगाव;
गायक – मुक्त ग्रुप महिला भजनी मंडळ, टिळकवाडी.

यावेळी वाचनालयाचे संचालक व पाहुण्यांच्या हस्ते सर्व विजेत्यांना रोख रकमेची पारितोषिके व स्मृतिचिन्हे प्रदान करण्यात आली. उद्घाटन दिवशी मंगळागौर सादर करणाऱ्या बापट गल्लीच्या कालिका देवी महिला मंडळाचाही यथोचित गौरव करण्यात आला. परीक्षक म्हणून श्रीकांत सुळेभावकर (कागणी) व बाबुराव सावंत (पेरणोली, आजरा) यांनी काम पाहिले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यवाह सुनिता मोहिते यांनी केले तर आभार प्रदर्शन रघुनाथ बांडगी यांनी केले.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

three × 1 =

error: Content is protected !!